पुणे(हवेलीनामाआॕनलाईन) पुण्याच्या मध्यवर्ती वस्तीतील दाट लोकवस्ती असलेल्या जुना बाजार परिसरात दुकानांना मोठी आग लागल्याची महिती मिळत आहे मंगळवार पेठेत गेली अनेक दिवसापासून जुना बाजार भरतो या बाजारात विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने आहेत. यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशामन जवानांकडून आग विझवण्याचे काम झाले. मात्र नेमकी या कशामुळे लागली होती याची माहिती अद्याप समजलेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या बाजारातील ८ ते ९ दुकानांना आज सकाळी आग लागली आहे. या भागांमध्ये वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत. प्राथमिक माहितीनुसार या आगीमध्ये सुदैवाने कोणीतीही जीवीतहानी नाही.
शहरातील मंगळवार पेठेत जुनाबाजर परिसर आहे. या भागांत असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानांना भीषण सकाळी ७.३० वाजता आग लागली. ही आग झोपडपट्टीपर्यंत पोचली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र दहा ते बारा दुकानं आणि झोपडपट्टीतील काही घरे जळून आगीत खाक झाली आहे.मंगळवार पेठ हा मध्यवर्ती शहरातील दाट वस्तीचा भाग आहे. त्यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यसाठी घटनास्थळापर्यंत जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. जवानांनी आपले कौशल्य दाखवत एका तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
