पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) तलवार कोयते पालघन यासारखी घातक शस्त्र हातात घेऊन त्याचे चित्रीकरण करून ते सामाज माध्यमात प्रसारित करून दहशत माजविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट ६च्या पथकाने गजाआड केले असून त्यांच्या विरुद्ध विना परवाना घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसात काही समाजकंटक तलवार कोयते पालघन यासारखी घातक हत्त्यार हातात घेऊन त्याचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमातून प्रसारित करून समाजात दहशत निर्माण करत आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट ६ मधील पथकास सूचना देण्यात आल्या त्यानुसार त्यातील एक व्यक्ती वाघोली येथील गेरा कन्ट्रक्शन येथे येणार असे समजले त्याची माहिती वरिष्ठांना काळविल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून राहुल मल्लापा चौगुले (वाघेश्वर झोपडपट्टी,वाघोली) यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्याकडे एक पालघन हत्यार आढळले.
तर याच पथकातील दुसऱ्या पथकास अशी माहिती मिळाली की,रामटेकडी हडपसर परिसरात आणखी एक व्यक्ती हातात शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कारखेले, लोहिगुडे पोलीस शिपाई टिळेकर, काटे यांनी सापळा रचून रोहन अनिल देडगे रामटेकडी वानवडी या व्यक्तीला ताब्यात घेतले त्याच्याकडे कोयता आढळला.त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस अंमलदार मच्छिद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन शिंदे, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकाटे, संजीव कळंबे, कानिफनाथ कारखेले, प्रतीक लोहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, सचीन पवार, शेखर काटे, नितीन घाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली.
