पुणे (ऑनलाइन हवेलीनामा)   वाघोली परिसरात गावठी कट्ट्याच्या सहाय्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने उधळून लावला एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक रमेश मेमाणे व बाळासाहेब सकाटे पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे,ऋषिकेश ताकवणे गस्त घालत असताना रमेश मेमाणे व बाळासाहेब सकाटे यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की,एक व्यक्ती पुणे अहमदनगर महामार्गावरील राणवारा हाँटेल जवळ गावठी कट्ट्यासह उभा आहे याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिली व त्यांच्या सूचनेनुसार मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचून सापळा रचून त्या व्यक्तीस ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता तो सुधीर भोला पुरबे असे त्याने त्याचे नाव सांगितले त्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्या कडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस सापडले.त्यास ताब्यात घेऊन लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध विना परवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
        ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट ६  चे पोलीस निरीक्षक गणेश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील ,पोलीस अंमलदार मच्छिद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन शिंदे, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकाटे, संजीव कळंबे, कानिफनाथ कारखेले, प्रतीक लोहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, सचीन पवार, शेखर काटे, नितीन घाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *