पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) भारतात काँग्रेस पक्षाचे खासदार राहूल गांधी यांनी काढलेल्या भारतजोडो याञाला उदंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे अनेक कारणानी ही यात्रा चर्चेत आहे अशातच भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्याबरोबर चालत असताना जालंधरचे काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. खासदार चौधरी हे ७६ वर्षांचे होते. दरम्यान, चौधरी यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमधून जात आहे. त्यात पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी सहभागी झाले होते. फगवाडाजवळील भाटिया गावाजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चौधरी यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या जालंधर मतदार संघात शोककळा पसरली आहे
