पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) कोयता गँगच्या विरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कोयता गँगच्या प्रमुखास अटक करण्यात आली आहे. तर अनेक गुंडाकडून कोयते जप्त केली आहेत. पुण्यात होणारी जी-20 परिषद तसेच आगामी प्रजासत्ताक दिन या अनुशंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली.यात पोलिसांनी या सर्व गुंडांवर मोठी कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँग, सराईत गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार, मोक्कामधील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आराखडा तयार केला. त्यानुसार पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवून त्यात अनेक गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी ३ हजार ७६४ गुन्हेगारांची चौकशी गुन्हेगारांकडून पिस्तूल, काडतुसे, १४५ कोयते जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात १३ जणांवर मोक्कानुसार कारवाई केली.

पुणे पोलिसांनी चालवलेल्या जोरदार मोहिमेनंतर भाजपने पोस्टरबाजी सुरु केली आहे. भाजप नेते व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारे पोस्टर झळकत आहेत. भाजप महाराष्ट्र या फेसबुक पेजवरुन ही पोस्ट शेअर केल्या आहेत

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात यशस्वी कोम्बिंग ऑपरेशन झाले. गुन्हेगारी आळा घालणारे केवळ युती सरकार आहे, असे या पोस्टच्या मुख्य मथळ्यात म्हटलं आहे. तसेच यासोबत शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये हे कायद्याचे राज्य आहे,’ कोयत्याच नाही असा उल्लेख केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *