पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) (पुजारी सर)
रोहित्र चोरीतील तब्बल २४ गुन्ह्यातील फरार आसलेल्या आरोपीस यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने दौंड तालुक्यातील वाळकी येथे कारवाई करत जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर गोरख पवार, वय २५ वर्षे, रा. वाळकी, ता. दौंड, जि. पुणे मुळ रा. राहुरी रेल्वे स्टेशन जवळ जि. अहमदनगर यास यवत गुन्हे शोध पथकाने अटक केले. पुणे जिल्ह्यामध्ये रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सन २०२१ व सन २०२२ मध्ये वाढ झाली होती. त्यावेळी यवत गुन्हे शोध पथकाने तब्बल ४६ गुन्हे उघडकीस आणून ५ टोळ्या जेरबंद करून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यापैकी दत्ता शिंदे, रा. राहू ता. दौंड, जि. पुणे याचे टोळी कडून २८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते, तेव्हा पासून सागर पवार हा फरार झाला होता तो वाळकी ता. दौंड, जि. पुणे येथे येणार असलेची माहिती यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली यावर गुन्हे शोध पथकाने वाळकी येथे जाऊन फरार आरोपी सागर गोरख पवार यास ताब्यात घेतले असून त्याचे टोळीतील इतर साथीदार १) | दत्ता अशोक शिंदे, वय २८ वर्षे, रा. राहु, थोरली विहीर, ता. दौंड, जि.पुणे, २) राज मच्छिंद्र वानखडे, वय १९ वर्षे, रा. केडगाव म्हसोबाचा मळा, ता. दौंड, जि. पुणे, मुळ रा. बिडगाव, ता. मुर्तीजापुर, जि. अकोला, ३) विशाल मनोहर सोनवणे, वय ३० वर्षे, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, ४) महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार, वय २९ वर्षे, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे, ५) लखन रमेश दोरके, वय २७ वर्षे, रा. समतानगर राहू, ता. दौंड, जि.पुणे, ६) सचिन बबन बरडे, रा. राहू वाकणवस्ती, ता. दौंड, जि. पुणे मुळ रा. वैजापूर स्वस्तिक टॉकीज जवळ, जि. औरंगाबाद, ७) इस्राक इर्शाद अली, वय ३८ वर्षे, रा. शिक्रापूर चाकण रोड CNG पंपा समोर, ता. शिरूर, जि. पुणे मुळ रा. कन्हारिया बुजुर्ग, ता. महाराजगांज, जि.लक्ष्मीपुर उत्तरप्रदेश (रिसिव्हर ), ८) निवृत्ती उर्फ मामा श्यामराव खळदकर, वय ३२ वर्षे, रा. नानगाव, ता. दौंड, जि. पुणे, ९) अक्षय सूर्यकांत उर्फ सुरेश खळदकर, वय २४ वर्षे, रा. नानगाव, ता. दौंड, जि. पुणे, १०) सुरज प्रकाश जाधव, वय २३ वर्षे, रा. नानगाव ता. दौंड, जि.पुणे, ११) अर्जुन दिलीप बर्डे, वय २० वर्षे, रा. राहूरी रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, ता. राहुरी, जि. अ.नगर, रा. वाडेबोलाई, ता. हवेली, जि. पुणे, १२) विकास गौतम बनसोडे, वय २३ वर्षे, रा. नानगाव ता. दौंड जि. पुणे, १३) पांडुरंग ऊर्फ भावड्या मोहन गायकवाड, वय २३ वर्षे, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे, १४) लईक ऊर्फ लाला मोहम्मद अमीन मणियार, वय २१ वर्षे, रा. चिखली (रिसिव्हर), ता. हवेली, जि.पुणे मु.रा गोंडा उत्तरप्रदेश यांना गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आली होती, तेव्हा पासून सागर पवार हा फरार झाला होता.
ही कामगिरी अंकित गोयल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, पोलीस हवालदार अक्षय यादव, होमगार्ड कमलेश भालेराव यांनी केली आहे.
