नाशिक (हवेलीनामा ऑनलाईन) नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या वन विभागातून मोठ्या प्रमाणात गुटखा बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खैर या दुर्मिळ झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले या वनविभागात अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याचाही आरोप केला आहे यातील तथ्य काय हे शोधून संबंधितावर कडक कारवाईची मागणी केली आहे. आपल्या देशाची वनसंपदा वैविध्यपूर्ण असून दुर्मिळ व औषधी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतात परंतु अशा दुर्मिळ प्रजातीची कत्तल होत असताना याचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.

नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागामध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पक्ष तोड होत असून यामध्ये खैर या दुर्मिळ वृक्षाची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आहे या लाकडाचा उपयोग गुटखा बनविण्यासाठी होत असल्याने याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे

दुर्मिळ अशा खैरवृक्षाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याने यासाठी स्थानिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाच यासाठी जबाबदार ठरले आहे त्यामुळे यावर शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *