पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती करता बँकेकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठविण्यासाठी उद्योग निरीक्षकाने पाच हजाराची लाच मागितली यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून ही लाच घेताना त्यास ताब्यात घेण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार,उद्योग निरीक्षक चंद्रभान परशुराम गोहाड याने तक्रारदाराकडे जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती करिता बँकेकडे शिफारस प्रस्ताव सादर करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.सुरुवातीस पाचशे रुपये ऑनलाईन एक हजार रुपये तर सापळा रचल्यावर दोन हजार रुपये घेताना त्यास ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधिक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *