वाघोली. (हवेलीनामा आॕनलाईन) — केसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रय मारुती हरगुडे तर उपसरपंच पदी सुरेखा सुभाष बांगर यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सचिन हरगुडे व उपसरपंच अक्षदा हरगुडे यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त झाली होती. आज झालेल्या सरपंच पद निवडणुकीत सरपंच पदासाठी दत्तात्रय हरगुडे व उपसरपंच पदासाठी सुरेखा बांगर यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक आधिकारीनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली या निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंचाला त्यांच्या मिञपरिवाराने सुखद धक्का देत भेटवस्तू म्हणून चारचाकी गाडी इंडिवर भेट दिली बहुधा ही हवेली तालुक्यातील पहिलीच घटना असल्यामुळे हवेली तालुक्यात या मिञपरिवारांची भेटची जोरदार चर्चा होत असून मैञी असावी तर अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ तसेच हवेली तालुक्यात सुरु आहे. सर्व मिञपरिवाराच्या वतीने सरपंचानी या गाडीची चावी सुफुर्त करण्यात आली या अगळ्यावेगळ्या भेटीमुळे सरपंच देखील भारावून गेले.सरपंचपदाच्या निवडीनंतर जल्लोष करण्यात आला. सरपंच नावाचा भला मोठा हार बनविण्यात आला होता. क्रेनच्या साह्याने तो उचलून धरण्यात आला. मित्र व समर्थक यांनी जल्लोष करीत गुलालाची उधळण करुन फटाक्याची अतिश बाजीने असंमत दुमदूमून निघाला होता तर गुलालाने संपूर्ण केसनंद चौक गुलालाने न्हाऊन निघाला होता ग्रामसेवक प्रदीप ढवळे, अशोक शिंदे, बगाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य गावातील माजी सरपंच सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठयाप्रमाणावर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *