पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स 2023 मध्ये एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी बोट क्लबच्या विद्यार्थिनी अनुष्का गर्जे आणि भाग्यश्री घुले यांनी कमी वजन गटाच्या महिला जोडीने रोइंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तसेच महिला 8+ गटात रौप्य तर 4ई गटात भाग्याश्री आणि अनुष्का यांच्यासोबत वैदेही देवी आणि हर्षिता पाटील यांनी कांस्य पदक जिंकले. एमआयटी एडीटी बोट क्लबने एकूण १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कास्य पदक जिंकले.
रोईंगच्या महिला 8+ स्पर्धेमध्ये भाग्यश्री घुले, अनुष्का गर्जे, वैदेही देवी, नेहा बधे, आर्या तुपे, अनामिका आर्या, साक्षी काकडे, आणि हर्षिता पाटील यांनी रौप्यपदक पटकावले. तर पुरुषांच्या 4ई स्पर्धेत अनिकेत उगलमुगल, अनिकेत कोलते, यशराज गायकवाड आणि शकील शेख यांनी रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्र रोईंग असोसिएशनने एमआयटी एडीटी बोट क्लब येथे रोइंग स्पर्धेचे आयोजन केले होते.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची आणखी एक चांगली कामगिरी ही विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. सर्व रोईंग खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. खेळाचे महत्व सर्वांना कळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे डॉ. रामचंद्र पुजेरी, क्रीडा संचालक श्री. पद्माकर फड, प्रशिक्षक पंकज गायकवाड, संदीप भापकर, आणि सुहास कांबळे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
