थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) छत्रपती शिवरायांनी आपल्या निवडक सहकार्याच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यातून हिंदवी स्वराज्य उभे राहिले देव, देश आणि धर्म यासाठी या स्वराज्याची उभारणी केली आणि अशा या राजाच्या शेवटच्या कालावधीत आपल्या पुत्राची भेट होऊ शकली नाही ही सल त्यांच्या मनात कायम राहिली यासाठी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेली सहा वर्ष शिवनेरी गड ते पुरंदरगड असा पालखी सोहळा हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली चालू झाला यावर्षी हा सोहळा शिवनेरीहून प्रस्थानानंतर थेऊर मुक्कामी विसावला.

वढू येथील मुक्कामानंतर हा पालखी सोहळा लोणीकंद, वाघोली, केसनंद, कोलवडी मार्गे श्रीक्षेत्र थेऊर येथे सायंकाळी सहा वाजता दाखल झाला या सोहळ्याचे ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळ तसेच ढोल ताशा पथक याच्या गजरात, नामसंकीर्तनात हा सोहळा येथे दाखल झाला यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच मुंबई महापौर केसरी दत्तात्रेय उर्फ आबा काळे यांनी देखील या सोहळ्याचे स्वागत केले.

येथील विठोबा रुक्मिणी मंदिरात स्वराज्य संघातील मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा कुंजीर,गोरख काळे,सुदाम काळे,बाबुराव कुंजीर, बाळासाहेब काळे,रुपचंद बोडके,नरसिंग सुरवसे,संपत बिनावत,विश्वनाथ तांबे,बापू सोनवणे,माऊली सरडे, शांताराम कंद,बाळासाहेब गिरमकर, रामभाऊ होळकर बाळासाहेब शेडगे,बाबू बोडके,लक्ष्मण कुंजीर, मान्यवर उपस्थित होते

मुंबई महापौर केसरी आबा काळे यांनी ग्रामस्थांची उपस्थिती याबद्दल प्रश्न उपस्थिती बद्दल खंत व्यक्त केली तसेच पुढील वर्षांपासून आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने हा सोहळा भव्य स्वरूपात करण्यात येईल असे सांगितले तर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी खूप मोठे काम केले त्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले या सोहळ्याला भव्य स्वरूप यावे हीच त्यांनी अपेक्षा व्यक्त केली तसेच ग्रामस्थांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

ह.भ. प. बाजीराव बांगर महाराज यांनी या रथयात्रेच्या संकल्पनेविषयी माहिती देताना सांगितले की पिता पुत्राची भेट घडवून आणण्याचा हा आपला मानस असून सन 2016 मध्ये काही निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने हा पालखी सोहळा सुरुवात केला आज यामध्ये अनेक जण सहभागी झालेले आहेत भविष्यात याचे स्वरुप भव्य असेल, महाराजांचे विचार पोहोचविण्यासाठी विचारांचे व्यासपीठ उभे करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *