पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत हडपसर येथील अक्षय संजय मुरकुटे यांनी घवघवीत यश मिळवले आहे महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून देशात सहावा क्रमांक मिळवून केंद्रीय आरोग्य मंञालयामध्ये सेंटर फूट आॕफिसरपदी त्यांची निवड झाली आहे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अहोराञ अभ्यास करुन त्यांनी हे यश संपादित केले आहे याचे श्रेय त्यांनी आपल्या आईवडील व चुलत्यांना दिले नुकतेच ते थेऊर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांचा थेऊर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा हवेली तालुका पंचायत समिती माजी सदस्य हिरामण काकडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी हभप एकनाथमहाराज तारु, थेऊर ग्रामपंचायत माजी उपसरपंच दत्तात्रय कृष्णाजी कुंजीर, माजी उपसरपंच पैलवान नितीन कुंजीर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य गोविंद तारू, प्रगतशील शेतकरी शिवाजी रघुनाथ कुंजीर,उद्योगपती संतोष गावडे, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत तारू, बाळासाहेब तारू,संजय मुरकुटे, सचिन मुरकुटे, आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *