पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) महाराष्ट्रात सध्या शिंदे फडणविस सरकाराचा मंञीमंडळ कधी होणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे शिंदे गटातील अनेकांची याबाबत धाकधूक वाढत आहे रखडलेला मंञी मंडळ नेमका होणार तरी कधी अशा चर्चा सुरु असून दोन दिवसापूर्वीच माजी मंञी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले होते की रखडलेला मंञीमंडळ विस्तार होणारच नाही.अशातच आज शिंदेच्या बंडात सगळ्यात पहिली उडी मारण्यावर आघाडी वर असलेले संभाजीनगरचे आमदार संजय सिरसाट यांनी मोठी घोषणा केली असून 22जानेवरी पर्यंत मंञीमंडळ विस्तार करावाच लागेल असे वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांनी मंञीमंडळ विस्ताराची कारणेच सांगून टाकली आणि एक प्रकारे इशाराच दिला असल्याची एक प्रकारची चर्चा सुरु झाली त्यांच्या याच वक्तव्याबाबत प्रविण दरेकर यांना विचारले असता त्यांनी अतिशय मिश्कील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की मंञीमंडळ विस्तारा बाबत मुंख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आणि पक्ष नेतृत्व घेत असत त्यामुळे हा विषय आमच्या आमदार पातळीवरचा नाही त्यामुळे हवेत कुणीही तारखा सोडू नये असा टोला विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी लगावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *