थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) अष्टविनायक सुविधा प्रकल्प अंतर्गत तयार करण्यात आलेल्या थेऊर फाटा लोणीकंद रस्त्याचे काम गेली चार वर्षापासून चालू असून यातील तिसरा पट्टा नुकताच पूर्ण झाला यात थेऊरगाव पासून थेऊर फाटा पर्यंतचे काम जवळपास पूर्ण झाले आहे रस्त्याची रुंदी कमी असल्याने आम्ही रस्ता तयार झाल्याने वाहनांच्या गतीत मोठी वाढ झाली आहे याचा परिणाम अपघाताचे प्रमाण वाढले आहे यावर शाळा असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत परंतु या गतीरोधकास पांढरे पट्टे मारले नसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नवख्या वाहनचालकास याची कल्पना येत नाही अचानक गतिरोधक आल्याने वाहनावरील ताबा जाण्याची शक्यता आहे किंवा अचानक वाहन थांबल्याने पाठीमागून येणारे दुसरे वाहन त्यावर आदळण्याची शक्यता वाढली आहे यासाठी या गतिरोधकांना पांढरे पट्टे त्वरित मारणे आवश्यक आहे

          एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने स्तंभास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात विशेषतः सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या मार्गावरून येणारे हे अनुयायी थेऊर फाटा थेऊर लोणीकंद याच मार्गाचा वापर करतात या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते त्यांना या मार्गाचा अंदाज येणार नाही म्हणून नवीन तयार करण्यात आलेल्या गतिरोधकास लवकरात लवकर पांढरे पट्टे मारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष मारुती कांबळे यांनी केलेली आहे.

           तसेच थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिर चौकात काँक्रीट रस्त्याच्या बाजूला एक खड्डा तयार झाला असून यामुळे दुचाकी स्वार घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे यासाठी संबंधित ठेकेदाराशी संपर्क करूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते या खड्ड्यात केवळ कच भरून तात्पुरती केली होती परंतु ती कच संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने त्यावरूनही दुचाकी स्वार घसरून पडण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे हा खड्डा डांबरीकरणानेच भरणे आवश्यक आहे अन्यथा अपघात घडला तर यासाठी कोणास जबाबदार धरणार असा प्रश्न स्थानिक विचारात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *