लोणी-काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) (रामभंडारी) पुणे सोलापूर महामार्गावर दररोज वेगवेगळ्या ठिकाणी अपघात होतात परंतु वाहतूक पोलीस हे अपघात टाळू शकतात हे जरी खरे असले तरीही ते रोखू शकत नाहीत कारण वाहन चालक अनेक वेळेला वाहतुकीच्या नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करून महामार्गावर वाहने चालवतात अनेक वाहनचालक तर मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवत असताना दिसून येतात असाच एक अपघात लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नर या ठिकाणी घडला यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला.
अपघात घडल्यानंतर अनेक वेळेला या अपघातासाठी वाहतूक पोलिसांनाच जबाबदार धरण्याचे सध्या फॅड असल्याचे दिसून येते परंतु महामार्गावरील अनेक वाहने हे वेगाने धावताना वाहनावरील ताबा गेल्याने अनेक वाहने दुभाजकांना धडकतात तर काही वाहने एकमेकावर धडकतात त्यामुळे बऱ्याच वेळेला जीवित हानी होते तर काही वेळेला गंभीर दुखापत होते अपघात कोणत्या कारणासाठी घडला या गोष्टी महत्त्वाच्या असताना त्या ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित होता का यावरच अनेक वेळा चर्चा होतात खरे तर वाहतूक पोलीस देखील एक माणूस असून त्याच्या मानसिकतेचाही विचार कोणी करताना दिसत नाही सर्व बाजूचा विचार करूनच आपली विवेक बुद्धी चा विचार करून यावर माहिती दिली तर नक्कीच या जनतेच्या सेवकांना अधिक चांगली सेवा देण्यास प्रवृत्त करता येऊ शकते.
एमआयटी कॉर्नर वर घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार महामार्गावर आला आणि स्वतःचा तोल जाऊन दुभाजकावर धडकला यात तो गंभीर जखमी झाला त्यावेळी तेथे कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस ताबडतोब धावून त्यांनी रुग्णवाहिकेला कळवले आणि त्या युवकास जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल केले अनेक वेळेला अपघातात जखमींना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांचा जीव वाचतो हे अशा अपघातावरून सिद्ध होते.
लोणी-काळभोर पोलीस स्टेशन शहर आयुक्तालयास जोडल्यानंतर वाहतूक नियंत्रणात सुधारणा होणे अपेक्षित होते परंतु यात दोन्ही बाजूचा सापेक्ष विचार अपेक्षित आहे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ तुलनेत अपुरे मनुष्यबळ याचा मेळ कसा बसणार हा प्रश्न उपस्थित होतो.
