पुणे (हवेलीनामा आॕनलाईन)

           छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे या पिता पुत्रांची भेट व्हावी यासाठी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने ह भ प बाजीराव महाराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शिवनेरी गड पासून पुरंदर गड असा पालखी सोहळा काढला जातो या पालखी सोहळ्याचे प्रस्थान सकाळी आठ वाजता शिवनेरी गडावरून मोठ्या उत्साहात झाले यावेळी पुणे जिल्ह्यातील अनेक शिवभक्त या ठिकाणी जमा झाले होते

          छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण असलेल्या शिवनेरी गडावरील जन्मस्थळी छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन व आरती करून हा सोहळा मार्गस्थ झाला या सोहळ्यात मान्यवर पदाधिकाऱ्यांसह अनेक शिवप्रेमी सहभागी होऊन सुरुवातीस हा सोहळा माता जिजाई यांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवाय देवी मंदिरात विसावला त्या ठिकाणी शिवाई देवीची महाआरती घेऊन उपस्थित शिवभक्तांना या सोहळ्याचे महत्त्व विशद केला यात संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज माणिक महाराज मोरे तसेच विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद एकबोटे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर देवस्थानच्या वतीने स्वराज्य संघ यातील पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि हा सोहळा पुढे पुरंदरच्या दिशेने मार्गस्थ झाला.

 

        या सोहळ्यात सोहळा प्रमुख ह भ प बाजीराव महाराज बांगर, ह भ प माणिक महाराज मोरे,मिलिंद एकबोटे,स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा कुंजीर,गोरख काळे,सुदाम काळे,नरसिंग सुरवसे,रघुनाथ काकडे,सोनवणे,माऊली सरडे, शांताराम कंद,बाळासाहेब गिरमकर, रामभाऊ होळकर आदी सहभागी झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *