थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) थेऊरफाटा – लोणीकंद महामार्गावर थेऊर हद्दीत चिंतामणी विद्यामंदीर जवळील वळणावर रमा माधव स्मृति स्थळाशेजारी सिंमेट काॕक्रीटच्या मालाने भरलेला मिक्सर हायवा चालकाला वळणाचा अंदाजे न आल्याने पलटी झाला यात शाळेच्या संरक्षक भितीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यावेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली रस्त्याच्या दुतर्फा कोलवडी तसेच थेऊरमध्ये वाहनाच्या रांगा लागल्या होत्य्या.

        रस्त्यावर हायवातील डिजेल व आईल सांडल्याने वाहने घसरण्याची शक्यता असल्याने अग्निशमन पथकास पाचारण करून रस्ता पाण्याने धुवून घेण्यात आला. महामार्गावरील वाहतुक ही जवळपास तीन ते चार किलोमिटर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या अपघाताची महिती मिळताच थेऊर पोलिस चौकीचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख,पोलिस हवालदार विशाल बनकर यांनी घटना स्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या चालकाला बाहेर काढून उपचार घेण्यासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले अपघात झाल्यानंतर वाहतुकीची प्रचंड कोंडी होती तसेच लोणी काळभोर वाहतुक विभागाचे पोलिस हवालदार उमेश ढाकणे,विजय दाभाडे,पोलिस मिञ संतोष गायकवाड,संतोष ओव्हाळ,राहूल गायकवाड यांनी दोन क्रेनच्या साहाय्याने मिक्सर रस्त्यातून बाजूला काढून वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.हायवामध्ये असलेली डिजेल टाकी अपघातात फुटल्याने रस्त्यावर डिजेल तसेच आॕईल सांडले होते त्यामुळे दुचाकी गाडी घसरण्याचा घोका होता.

         अपघात घडल्याचे समजताच थेऊर येथील हवेली तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मारुती कांबळे,दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद वैराट आदी समाजसेवक तरुण मदतीस धावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *