थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) प्रवासी वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून विशिष्ट नियमावली लागू असून तीन व सहा आसनी रिक्षा मार्गावर प्रवाशांना सेवा देतात परंतु या परिवहन विभागाच्या नियमांना बाजूला सारून तीनशे रुपये भरा व वाटेल तेवढे प्रवासी वाहतूक करा अशाच प्रकारची चित्र सध्या पुणे सोलापूर महामार्गावर पूर्व हवेलीत सध्या दिसून येत आहे.गेल्या काही महिन्यामध्ये तीन आसनी रिक्षांना परवानगी मोठ्या प्रमाणात दिल्याने रस्त्यावर या रिक्षा दिसून येत आहेत तरुणांनी व्यवसाय करून आपला रोजगार निर्माण करावा याच अर्थ हेतूने शासनाने हे परवाने देण्यात आलेत परंतु अलीकडे परवानगी पेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्याकडे अनेकांचा कल वाढलेला आहे विशेषता तीन आसनी रिक्षामध्ये सात ते आठ प्रवासी वाहतूक सर्रास पणे केली जाते यावर मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक वाहतूक शाखेच्या वतीने यावर कारवाई केली जात नाही यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचे बोलले जाते भ्रष्टाचार थांबविण्यासाठी केवळ गर्जना करून चालणार नाही तर यासाठी चोख पावले उचलली तरच समाज योग्य वळणावर येऊ शकतो या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्या रिक्षाचालकास जबाबदार धरणार की नियमन करणाऱ्या वाहतूक व्यवस्थेला जबाबदार राहणार हा प्रश्न यातून उपस्थित होतो. एखाद्या दुर्गम भागात जाण्यासाठी वाहनाची उपलब्धता नसेल तर अशा ठिकाणी अनेक वेळेला अशा अधिक प्रवाशांची वाहतूक करताना आढळले तर कदाचित ते गैर असू शकते परंतु पुणे सोलापूर महामार्गावर सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच पी एम पी एल बसेस त्याचप्रमाणे खाजगी रिक्षा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना एवढी अवैध प्रवासी वाहतूक कशी व कोणाच्या आशीर्वादाने चालते याची सखोल चौकशी शहर वाहतूक उपायुक्तांनी करणे आवश्यक आहे.यात विशेष बाब म्हणजे रस्त्यावर अस्ताव्यस्त उभे राहून वाहतुकीस आडथळा निर्माण केला जातो बाजारच्या दिवशी तर हे भयंकर चित्र दिसून येते वाहतूक नियंत्रण होताना दिसत नाही पदचारी,बसस्थानकावर प्रवाशांना उभे राहण्यास जागाच शिल्लक नसते.अवैध प्रवासी वाहतुकीसाठी एक विशिष्ट रक्कम आकारली जात असल्याचेही माहिती पुढे आलेली आहे त्यामुळे ही अवैध वाहतूक थांबणार की नाही सामान्य माणसाला यातून सुटका मिळणार की नाही.कोण मार्ग काढणार हे अनुत्तरीत आहेमहामार्गावर आपल्या चारचाकी वाहनातून प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनीही सीट बेल्ट लावणे कायदेशीर बंधनकारक केलेले असताना सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या रिक्षा मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था आहे हा प्रश्न उपस्थित होतो कारण अशा वाहनातून परवानगी पेक्षा कित्येक अधिक प्रवासी कोंबून त्यांची वाहतूक केली जाते अशावेळी एखादा अपघात झाला तर त्यांनच्या सुरक्षेसाठी कोणती उपाययोजना अशा वाहनातून आहे याचाही विचार शासनकर्त्यांनी करण्याची गरज आहे.
