थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा मुख्य चौकात हाय मॅक्स लाईट खांबाशेजारी अंधश्रद्धेतून एक उतारा टाकलेला होता हा उतारा या महामार्गाने जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष केंद्रित करत होता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम आजही मोठ्या प्रमाणावर चालू असून अनेक भोंदू आपला प्रपंच यावर चालवत असल्याचे दिसून येत आहे राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात अजूनही अनेक जणांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना गंडा घालण्याचे काम काही लोक करत आहेतमहाराष्ट्रामध्ये अनेक पंथ जाती प्रचलित असल्या तरीही समाज प्रबोधनाचे काम संत महंतांनी सातत्याने करताना दिसते परंतु काही भाबडे नागरिक अशा अंधश्रद्धेला बळी पडताना दिसतात भूत बाधा होणे भानामती अशा अनेक गोष्टी समाजात प्रचलित आहेत आपल्यावर कोणी अशी काळी जादू केली म्हणून मांत्रिका कडे जाऊन यावर उपाय करण्याचे व आघोरी कृत्य करण्याचे काम सातत्याने चालू असते यापैकीच एक म्हणजे उतारा होय असे उतारे पौर्णिमा अमावस्या अशा विशिष्ट दिवशी रस्त्यावर अथवा एखाद्या ठिकाणी टाकल्याची दिसून येते यामुळे नागरिकांमध्ये कुतूहल तर कधी भीती सुद्धा निर्माण होताना दिसतेअंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा कृती विरोधात कायम आवाज उठवते परंतु अनेकांच्या डोक्यातून ही संकल्पना निघताना दिसत नाही विशेषतः लहान मुलांवरती अशा वाईट गोष्टींचा जास्त प्रभाव पडत असल्याचा नागरिकांचा समाज आहे
