थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) प्रत्येक देशाचा इतिहास हा येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक ठरत असतो आणि यातूनच नवीन पिढी घडत असते त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाची जाण करून देणे हे आपले कर्तव्य आहे थेऊर हे एक असेच ऐतिहासिक ठिकाण असून येथे श्रीमंत माधवराव पेशवे यांनी त्यांचा शेवटचा काळ श्री चिंतामणी गणपती मंदिरात घालवला आणि येथूनच संपूर्ण राज्याची धुरा हाकली जात होती त्यांच्या पत्नी रमाबाई पेशवे या देखील त्यांच्या या प्रशासकीय कामात महत्त्वाची भूमिका बजावत होत्या त्यांचा आजार बळावत असताना हा राज्याचा डोलारा चालवण्याची मुख्य जबाबदारी ही रमाबाई पेशवे यांच्यावरच होती.

माधवराव पेशवे यांचे निधन थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर येथे कार्तिक वद्य अष्टमी या दिवशी झाले त्यानंतर त्यांच्या पत्नी रमाबाई पेशवे यांनी आपल्या पतीसह सती जाण्याचा निश्चय केला या त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज थेऊर येथे त्यांच्या स्मारकास आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परंतु या महान कुशल प्रशासकाच्या कामगिरीची कोणालाही आठवण अथवा स्मृति होत नाही दरवर्षी काही विशिष्ट मंडळी यात सहभागी होतात खरे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची पताका अटकेपार फडकविण्याचे काम याच काळात झाले विशेष म्हणजे पानिपत लढाईनंतर मराठी साम्राज्याची धुरा माधवराव पेशवे यांच्यावर येऊन पडली ती त्यांनी सार्थपणे निभावत असताना त्यांनी काही कठोर निर्णय घेऊन काही विश्वासू सहकाऱ्यांच्या बळावर अतिशय सुव्यवस्थित मार्गावर आणली अत्यंत करारी बाणा असणारे माधवराव तारुण्यातच काळाच्या पडद्याआड गेले

आज त्यांचा स्मृतिदिन येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात त्यांच्या स्मृतीत स्थळी पार पडला यावेळी थेऊर येथील सुप्रसिद्ध प्रभात बँड व काही निवडक स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यामध्ये पालखीतून श्रीमंत माधवराव पेशवे यांचे तेल चित्र स्मारकापर्यंत नेण्यात आले पालखीचे सारथ्य जयंत व्हावे व दिनेश आगलावे यांनी केले स्मृतिस्थळावर जाऊन स्मृती वृंदावन सोडी पातळ व ओटी अर्पण करण्यात आली.

पूर्वी रमा माधव स्मृतिदिनी महान इतिहासकार यांचे व्याख्यान आयोजित केले जात असे यामध्ये रणजीत देसाई शिवाजीराव भोसले यासारख्या महान वक्त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत तसेच अनेक इतिहास अभ्यासप्रेमी यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे परंतु अलीकडे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *