थेऊर( हवेलीनामा ऑनलाईन) गावच्या कक्षा रुंदावल्याने अंत्यविधीसाठी नागरिकांना शव वाहिनी असल्याची आवश्यकता निर्माण झाली तीन ते चार किलोमीटर अंतर खांद्यावरून सर्व स्मशानभूमीपर्यंत आणणे अलीकडच्या काळात अडचणीचे होत असल्याने थेऊर येथील चिंतामणी सेवा मंडळ व थेऊर ग्रामस्थ यांच्या वतीने थेऊरगाव साठी वैकुंठ रथाची उभारणी करण्यात आली यासाठी अनेक नागरिकांनी सढळ हाताने मदत केलेली असून काल धनत्रयोदशीच्या दिवशी हारत थेऊर येथे आणण्यात आला
अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गाव येथील लोकसंख्या अलीकडच्या काळात झपाट्याने वाढली असून नगर वस्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे अनेक लोक वस्त्या गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत असून खाली दुःखद घटना घडल्यानंतर त्या ठिकाणाहून शव स्मशानभूमीपर्यंत आणणे अडचणीचे होत होते या सर्व गोष्टींचा विचार करून थेऊर मधील चिंतामणी सेवा तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वैकुंठ रथाची उभारणी करण्याचा निर्णय केला यासाठी थेऊर स्मशानभूमीत दशक्रिया विधी दरम्यान यावर चर्चा होऊन गावातील अनेक नागरिकांनी यात आपापल्या परीने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले यातूनच या वैकुंठा रथाची उभारणी करून काल धनत्रयोदशीच्या दिवशी हा वैकुंठ रथ थेऊरकरांच्या सेवेत सादर झाला आहे ही सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येणार असल्याचे चिंतामणी सेवा मंडळ यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
काल हा वैकुंठ रथ चिंतामणी मंदिरासमोर उभा करुन त्याची विधीवत पुजन करुन गावच्या सेवेत सादर झाला आहे.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.हा एक उपयुक्त उपक्रम असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.याच्या उभारणीसाठी सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च आल्याचे कळते.
