थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीतील परीस फाउंडेशनच्या वतीने गरीब कष्टकरी महिलांसाठी नवीन कपडे व फराळ वाटप करण्यात आला या संस्थेच्या वतीने दरवर्षी अशा कष्टकरी महिलांना साड्या व दैनिक उपयोगी लागणाऱ्या कपड्यांचे वाटप करण्यात येते.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे दिवाळीच्या उत्सवावर महामारीचे संकट आल्याने अनेक उत्सव सर्वसामान्य नागरिकांना साजरे करता आले नाहीत परंतु यावर्षी सर्व निर्बंध उठल्याने प्रत्येकाच्या जीवनात हा आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी समाजातील वेगवेगळ्या व्यक्ती आपापल्या परीने गरीब व कष्टकरी नागरिकांना मदत करून त्यांच्या आनंदात सहभागी होतात परिस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष तथा कुंजीरवाडीच्या माजी सरपंच सुनीता संदीप धुमाळ या गेली अनेक वर्षापासून अशा नागरिकांना मदत करत आहेत. यावर्षीही त्यांनी नर्सरी मध्ये काम करणाऱ्या गरीब व कष्टकरी महिलांना साड्या व कपडे याचे वाटप केले यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.यावेळी प्रिंसिका बराटे,शुभम धुमाळ, आजित धुमाळ उपस्थित होते.

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा सण असला तरीही गरीब व कष्टकरी यांच्या जीवनात नित्याचेच कष्टाचे काम असते त्यामुळे अशा आनंदाच्या क्षणी आपल्या कुटुंबीयासमवेत मुलाबाळांसमवेत काही वेळ घालवावा असे प्रत्येकांनाच वाटते परंतु महागाईने त्रस्त झालेल्या या कष्टकऱ्यांना एक दिवस ही सुट्टी घेता येत नाही म्हणून समाजातील काही व्यक्ती आपल्या आनंदात अशा कष्टकऱ्यांना सहभागी करून त्यांच्या लहान मुलांना मिठाई, चॉकलेट्स, नवीन कपडे देऊन तसेच महिलांना नवीन साड्या वाटप करून आनंद साजरा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *