थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) खेळामध्ये भारतीय युवकांना मोठ्या प्रमाणात सुवर्णसंधी उपलब्ध असून तरुणांनी आपले कौशल्य दाखविल्यास निश्चित त्यांचे भवितव्य उज्वल असेल अशाच प्रकारची कामगिरी या ठिकाणी या मुलीने करून दाखवली ज्यामुळे आपल्या देशाचं मान उंचावलेली आहे.शासनाने खेळाडूच्या सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत युवा खेळाडूंनी अशीच प्रेरणा घेऊन भविष्यात कामगिरी केली तर भारत हा जगामध्ये खेळात नक्कीच वरच्या क्रमांकावर पोहोचेल असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी केले.
सातारा येथील अनुष्काने सुवर्ण पदक पटकवल्याने तिचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते वर्णे(ता.सातारा)येथील शेतकरी कन्या अनुष्का कुंभार हिने कुवेतमधील अॕथेलेटिक्स स्पर्धेत मिडले रिले यास्पर्धत सुवर्ण व ४००मीटर वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले तिची थेऊर मधून वाजगाजत मिरवणूक काढण्यात आली थेऊर पोलिस चौकी तसेच चिंतामणी विद्यामंदीर,महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ यांच्या वतीने तिला सन्मानित करण्यात आले यावेळी चिंतामणी विद्यामंदीरचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे,हवेली तालुका आरपीआयचे अध्यक्ष मारुती कांबळे वर्णे गावचे माजी सरपंच दत्ताञय कुंभार,पञकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे,पोलिस हवालदार विजय जाधव,विशाल बनकर,महाविर कुटे,दिगंंबर जगताप, ग्रामपंचायत सदस्य गौतमी कांबळे,पोलिस मिञ भगवान शेडगे,संतोष गायकवाड,राहूल गायकवाड,संतोष ओव्हाळ,चिंतामणीचे पुजारी सचिन आगलावे,उपस्थित होते.

सातारा येथील अनुष्काने सुवर्ण पदक पटकवल्याने तिचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते वर्णे(ता.सातारा)येथील शेतकरी कन्या