थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) (शरद पुजारी) मटका व जुगार यामुळे तरुणाई भरकटली असून याला आळा कोण घालणार असा सवाल उपस्थित होत आहे. गल्लोगल्ली, चौकात केवळ याचाच बोलबाला निदर्शनास येतो वरवर पाहता अवैध धंदे चालू दिले जाणार नाहीत अशी बतावणी केली जात असतानाच धंदेवाईकांना सरळ परवाणगी दिली जाते.एखाद्या बाजारपेठेतील लिलावाप्रमाणे यात देवाणघेवाण होत असल्याचे दिसून येत आहे.
एका बाजुला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री अशा अवैध मार्गाच्या विरुद्ध कारवाईची भाषा करत असताना याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच अशा धंद्यांना आश्रय देत खतपाणी घालत असेल तर समाजाच्या हिताचा प्रश्न कसा मार्गी लागणार?
लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतेक गावातील परिस्थिती फार वेगळी नाही मटक्यामुळे अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर अलिकडे तरुण वर्ग मोठ्याप्रमाणात याकडे आकृष्ट झालेला आहे.याचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.पैसे मिळाले नाही तर गंभीर गुन्हे घडण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार या धंद्यासाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असून याला प्रतिबंध करणारेच आश्रय देताना दिसून येत आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करावी असा सूर सर्वसामान्य नागरिकांमधून येत आहे.
