थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन)  (शरद पुजारी) सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासकीय राज राज्यकर्ते अनेक वेगवेगळे नियम कायदे यांचे अंमलबजावणी करत असतात परंतु या नियमांना आणि कायद्यांना फाटा देऊन अनेक जण यात आपल्या फायद्यासाठी एक समांतर साखळी निर्माण करतात आणि सामाजिक आरोग्य बिघडवण्यास मोठा हातभार लावतात अशाच राज्य सरकारने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य सुगंधी मसाला व गुटख्यावर गेल्या अनेक वर्षापासून राज्यात बंदी केलेली असली तरीही यावर नियंत्रण सोडाच परंतु सध्या फुले हा याची विक्री होताना दिसत आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर विशेषतः लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये अवैध धंद्यांवर नुकतेच पदभार स्वीकारलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी वचक ठेवण्याचा दृष्टिकोनातून पेट्रोल व डिझेल चोरांवर मोठी कारवाई करून यातील एका बड्या माशाला गजाआड केले यामुळे परिसरात अवैध धंदेवायकांची धाबे दणाणले अशाच प्रकारची मोठी कारवाई अन्य अवैध धंद्यांवर होणे आवश्यक असल्याचा सूर नागरिकांमध्ये होत आहे आणि ही कारवाई भविष्यात लवकरच होईल अशी अपेक्षा नागरिक करत आहे.

सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात गुटक्यांची विक्री होत आहे हा गुटका येतो कुठून या मागचा मुख्य सूत्रधार कोण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही समांतर यंत्रणा कार्यरत असताना याकडे संबंधित विभागाचे लक्ष का गेले नाही की यामध्ये काही काळेबेरे आहे अशा संशयाला वाव आहे कारण कधीतरी अधून मधून छोटी मोठी कारवाई होते पाच दहा लाखाचा कधी 50 लाखाचा गुटखा हस्तगत केला जातो परंतु यामागचा मुख्य सूत्रधार नामा निराळा राहतो म्हणून याच्या मुळाशी जाऊन गुटखा माफिया याच्या भोवतीचा फास आवळणे आवश्यक असल्याचे समाजसेवींचे म्हणणे आहे.

सध्या गुटखा प्रत्येक पान टपरीवर सहज उपलब्ध आहे या टपरीधारकांना तो सहज उपलब्ध होतो यात एक सक्रिय यंत्रणा कार्यरत असून ती उध्वस्त करण्याची नितांत गरज आहे अन्यथा तरुणाई असाध्य रोगाच्या हरी जाण्याची भीती निर्माण होत आहे अनेक तरुण अशा गुटक्यांमुळे कॅन्सर सारख्या रोगाच्या बळी पडत आहेत त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याचा विचार करून पोलीस यंत्रणेने यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून आजपर्यंत अशा व्यवसायावर किती कारवाई झाली याबद्दल फार माहिती कळू शकलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *