पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत गजा मारणे टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारावर कारवाई करण्यात आली त्यातील एक प्रमुख सहकारी डाॅ प्रकाश बांदिवडेकर यास अटक करण्याची कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट 6 वर सोपविण्यात आलेली होती.ती कामगिरी या पथकाने सार्थ ठरवली.

 

डॉ. प्रकाश बांदिवडेकर हा सर्वत्र “डॉक्टर डॉन” या नावाने प्रसिद्ध असून त्याची मुंबईतील कुख्यात गुंड छोटा राजन या टोळी विरुद्ध दुश्मनी आहे.आजपर्यंत बऱ्याच खून प्रकरणात तसेच गॅंगवॉर मध्ये डॉ.प्रकाश बांदिवडेकर याचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे.पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागल्याने तो चंदगड जि.कोल्हापूर येथून पसार झाला,त्याला अटक करण्याची जबाबदारी ही

गुन्हे शाखा युनिट 6 कडील अधिकारी व अंमलदार यांची आज पर्यंतची उल्लेखनीय कामगिरीचा अनुभव लक्षात घेवून पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुंड गजा मारणे टोळीच्या खंडणी प्रकरणातील डॉ प्रकाश बांदिवडेकर याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे युनिट ६ कडील पथकाने इंदूर, मध्यप्रदेश येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याबद्दल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस अपनिरिक्षक भैरवनाथ शेळके, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार या पथकाचे कौतुक केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *