थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) महात्मा गांधी यांना महात्मा हि पदवी थोर विचारवंत रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. ते गांधीजींचे भव्य कार्य आणि दिव्यदृष्टी पाहूनच. बापूंचे जीवन जाणून घेण्यासाठी त्यांच्या जीवन चरित्राच्या पुस्तकांची पारायणे नित्य झाली पाहिजेत.असे डॉ.मोहिते हे द फादर फाउंडेशनच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पापळवाडी खेड येथील कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले. एका गालावर मारल्यावर दुसरा पुढे करणे खूप मोठ्या मानसिकतेचे लक्षण आहे.ते गांधीविचारात मिळते. कार्यक्रमात पहिल्या सत्रातील मुक्त चिंतनाची सुरुवात फाउंडेशनचा ध्वज फडकाऊन झाली. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म.भा.चव्हाण यांचे पिताश्री भागोजी भिकाजी चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्याम पवार, ॲड. रमेश पवळे आणि मीरा शिंदे यांनी गांधी विचारांचे मौल्यवान चिंतन दिले.

नंतर दुसऱ्या सत्रात साहित्य सम्राट पुणेचे १५६ वे संयुक्त कविसंमेलन सुप्रसिद्ध कवयित्री सौ.मीरा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कविसंमेलनामध्ये किशोर टिळेकर, अमृता जोशी, विनोद अष्टुळ, दत्ता सूर्यवंशी, रमेश पवळे, श्याम पवार, के.पी.घुमाट, विठ्ठल आरुडे, संजय राळे, विजय जाधव, बाबासाहेब गायकवाड, प्रल्हाद शिंदे, सूर्यकांत नामुगडे, कैलास तावडे, अलका जोगदंड, श्रीमती जयश्री जवळेकर, यमुनाताई चव्हाण, संध्या जाधव, बेबीताई कड, इंदायणी कड, म.भा. चव्हाण आणि अमरावतीचे गझलकार किरण सूर्या अशा दिग्गज कवी कवयित्रींनी आपल्या बहारदार गझला आणि कवितांनी ग्रामस्थ रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाची प्रस्तावना फाउंडेशन च्या सचिव अमृता जोशी यांनी, सदाबहार सूत्रसंचालन साहित्य सम्राटचे अध्यक्ष कवी विनोद अष्टुळ यांनी तर आभार फाउंडेशनचे विश्वस्थ किशोर टिळेकर यांनी व्यक्त केले.
