थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) कदम-वाकवस्ती, ग्रामपंचायत परिसरात ईद-ए-मिलाद अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात रविवारी साजरी करण्यात आली. या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपला सामाजिक सहभाग नोंदवला. पवित्र ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाजातील बांधवांनी जोरदार तयारी केली होती, ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती, लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त ठेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली.

यामध्ये रमजान तांबोळी, इजाज शेख, उमरखान, यांची समाज उपयोगी, लोकोपयोगी कामे उल्लेखनीय असून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले, समाजात चांगले कार्य करणाऱ्या लोकांची दखल घेवून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची गरज असल्याची जाणिव होते, लोणी काळभोर , कदम-वाकवस्ती परीसरात सर्वांना परीचित आसलेले रमजान तांबोळी, इजाज शेख, उमर खान या सामाजिक कार्यकर्त्या विषयी मिळालेल्या माहीती नुसार त्यांनी आत्तापर्यंत समाजशास्त्रातील समाजकार्याची तत्वे व मूल्यांची जपवणुक करून ठरवन दिलेल्या उद्दिष्टानुसार समाजातील विविध घटकांतील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन मदत करीत आलेले आहेत, समाजकार्याच्या आधारे लोकांच्या समस्यांचे निदान करून त्यावर त्वरीत उपाय शोधुन समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढून सज्ज आसतात, व्यक्ती हा समाजाचा एक घटक असतो. त्यांची कार्यशैली इतकी वाखाणण्याजोगी आसते की ते सहकार्यासोबत प्रेम व बंधुभावाची भावना, ठेवत लोकांची कामे तडीस नेतात. पिडीतांच्या समस्या हाताळण्यासाठी अंगीकारलेली कार्य पद्धती यामुळेच समाजाचा विकास होताना दिसुन येत आहे, वैफल्यग्रस्त

व्यक्तींच्या समस्या सोडविणे व त्यांच्या गरजा पूर्ण करणे व त्यांना साहाय्य करणे हे सामाजिक कार्यकर्त्यांची प्रमुख उद्दिष्ट्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *