पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पोलिस स्टेश्नन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा ब फायनल करण्यास मदत करण्यासाठी जुन्नर पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक याने एका खाजगी इसमाच्या सहकार्याने एक लाख रुपयांची मागणी केली यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन गुन्हा नोंदवला आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पञकानुसार तक्रारदार याच्यावरील गुन्ह्याचा ब फायनल करण्यासाठी जुन्नर पोलिस स्टेशन मधील पोलिस उपनिरीक्षक अमोल साहेबराव पाटील याने खाजगी इसम केतन अशोक पडवळ यांच्या सहकार्याने एक लाख रुपयांची मागणी केली यावर तक्रारदार याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करुन तक्रार दाखल केली यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच स्विकारण्याचा प्रयत्न केला यात पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील यास अटक करण्यात आली असून विशेष न्यायलयाने चार आॕक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.
