थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) स्त्रीचे समाजातील स्थान अनन्यसाधारण असून संसारातील महत्वाची जबाबदारी सांभाळत असल्यानेच पुरुषांना घराबाहेर पडून काम करता येते नारी शक्तीचा गजर हा नवराञ महोत्सवा पुरता मर्यादित ठेवून चालणार नाही तर कायमच त्यांचे महत्त्व अबाधित राहिले पाहिजे असे मत भारतीय जनता पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.थेऊर येथील महातारीआई ग्रामविकास प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित नवराञ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी आमदार ॲड राहुल कुल,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,पुणे शहाराचे पोलीस उपायुक्त राजा रामासामी,भाजप प्रदेश उपाध्यक्ष जालींदर कामठे, हभप ज्ञानेश्वर मेश्राम,पुणे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त बन्सीधर देसाई ,सेवानिवृत्त पोलीस उपाधिक्षक सुहास गरुड,सेवानिवृत्त पोलीस उपाधिक्षक राहुलकुमार येवले,लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण,हवेलीच्या माजी सभापती चंद्रभागा काकडे,भाजप तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे,शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर,अखिल वारकरी मंडाळाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र कुंभार महाराज,ह.भ.प. राजाराम जगताप महाराज,धनकवडीचे माजी सरपंच अर्जुन तापकीर,सरपंच एल.बी. कुंजीर,पुणे महानगर सदस्य सरपंच स्वप्निल उंद्रे, सरपंच सचिन सातव,माजी सरपंच रघुनाथ चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष प्रविण काळभोर,जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, संदिप पाटील,माजी उपसरपंच भरत कुंजीर,
उपस्थित होते.
तसेच दौंड तालुक्यातील आमदार ॲड राहुल कुल यांनी आपण लवकरच पाटस येथील साखर कारखाना चालू करणार असून सध्या अस्तित्वात आलेले सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे सरकार आहे असे सांगतानाच यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी आपण हवी ती मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्याप्रमाणात वाढल्याचे सांगितले.लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्यावेळी गावपातळीवर काम करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच नवनाथ काकडे यांनी केले.
