थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) अर्जुनाई सेवाभावी संस्था संचालित अर्जुनाई वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आळंदी देवाची पुणे, येथे गुणगौरव सोहळा पार पडला, अर्जुनाई वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक २५ रोजी गुणगौरव सोहळा पार पडला. समाजामध्ये विविध क्षेत्रात प्रमार्थिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, कला क्षेत्रात सतत जायचे योगदान आहे, अशा मंडळी चा गुणगौरव पुरस्कार सोहळा पार पडला, त्यामध्ये संस्थेमधील विद्यार्थ्यांचे कला कौशल्य व त्याना प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात आले, त्या निमित्त जालिंदर बपाजी जगताप यांचं भव्य अन्न दान पार पडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ महाराज बहिर यांनी केले, कार्यक्रम व्यवस्थापन व सत्कार चेतन महाराज माथेफोड शास्त्री अध्यक्ष अर्जुनाई वारकरी शिक्षण संस्था यांनी केले, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला, त्यामध्ये विशेष सुरेश उगले पी.एस.आय, चिंचवड ह.भ.प,माऊलीं महाराज लाड, मराठी वृत्तपत्र तपासपथक उप-संपादक राम भंडारी, सचिन कुंजीर, अमोल खोले, अमन शेख अशा मंडळीचा गुणगौरव पुरस्कार सोहळा पार पडला, त्या मध्ये संस्थेमधील विद्यार्थ्यांचे कला कौशल्य व त्याना प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात आले.

त्यानिमित्त जालिंदर जगताप यांचं भव्य अन्न दान पार पडले, यावेळी कुंजीरवाडी ग्रामपंचायत सदस्य हरेश गोठे, रामभाऊ मुरकुटे, शरद दाते, राजाभाऊ मुरकुटे, ह.भ.प, मुक्ता माथेफोड, विवेक माथेफोड, दीपक महाराज सुद्रिक, गणेश गलांडे, अनिल कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते, तसेच चिंचवड येथील शिक्षक दाम्पत्य प्रा.दीपक जाधव आणि प्रा.वैशाली गायकवाड यांची चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश उगले यांच्या हस्ते विशेष पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *