पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) हडपसर पोलीसांनी जबरदस्त कामगिरी करत गेल्या अठ्ठेचाळीस तासात एक खुन एक दरोडा व दोन जबरी चोर्यांच्या गुन्ह्यांचा तपास केला यात आठ जणांना गजाआड करुन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हडपसर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,मंतरवाडी रस्त्यावर एका ट्रक चालकास दुचाकी आडवी मारुन त्याच्याकडील मोबाईलसह पंधरा हजार रोख रक्कम हिसकावून घेतल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
याच परीसरात मार्शल प्रशांत भोसले आणि हेमंत कुंभार हे मंतरवाडी रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाची अॅक्टिव्हावर ट्रिपल सिटजाताना काही संशयीत दिसून आले . भोसले व कुंभार यांनी अॅक्टीव्हाचा पाठलाग करून गाडीवरील तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला . परंतु संशयीत तिघेजण अॅक्टीव्हा सोडून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले . पोलीसांचे ताब्यातील अॅक्टीव्हाचा तपास करता तपास पथकातील अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांनी आरोपी १ ) ओमकार ऊर्फ खंड्या राजु शिंदे वय २२ वर्ष रा . वैदुवाडी हडपसर पुणे व दोन अन्य विधीसंघषीत मुलांना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे हे करीत असून आणखी जबरी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे .
दुसर्या एका घटनेत माळवाडी हडपसर चौकात डोक्यामध्ये गंभीर जखमा आणि रक्तस्त्राव होऊन बेशुध्द एक इसम पडल्याचे माहीती प्राप्त झाल्याने हडपसर तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तसेच अंमलदार समिर पांडुळे , प्रशांत दुधाळ , निखील पवार , शाहीद शेख , प्रशांत टोणपे , भगवान हंबर्डे , अनिरूध्द सोनवणे , अतुल पंधरकर हे तात्काळ घटनास्थळी पोहचुन तपास सुरु केला . पोलीस अंमलदार प्रशांत टोणपे यांना मिळालेल्या बातमीवरून या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा विठ्ठल रेखले वय २७ वर्ष रा . कवडी गाव टोल नाका , लोणीकाळभोर पुणे यास गुन्हा घडल्यानंतर २ तासात ताब्यात घेतले . केलेल्या तपासात आरोपी कृष्णा रेखले याने भंगार विक्रीतील पैसे वाटपाच्या वादावरुन भांडणात सागर गायकवाड यास बांबुने आणि दगडाने मारहाण करुन ठार मारल्याचे निष्पन्न झाले असुन गुन्हयातील हत्यार रक्ताने माखलेला मोडका बांबू ताब्यात दिले आहे . गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले हे करीत आहेत .
ऑगस्ट महिन्यात पहाटे ०३.३० वाजन्याच्या सुमारास संजय रामदास उमाळे निर्मल टाऊनशिप सोसायटी समोरील कॉर्नर , काळेपडळ येथून पायी जात असताना होंडा शाईन गाडीवरून आलेल्या तीन इसमांनी त्यांना धमकावून त्यांचेकडील रोख रूपये व मोबाईल हे जबरदस्तीने चोरून नेल्याचा हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला,या गुन्ह्यातील आरोपी ऋषीकेश भारत पांचाळ वय २० वर्ष रा . जेएसपीएम कॉलेज पाठीमागे , आदर्शनगर ऊरूळी देवाची पुणे हा फरारी झाला होता. तपास पथकातील पोलीस अंमलदार निखील पवार आणि प्रशांत दुधाळ यांना मिळालेल्या बातमीवरून ऋषीकेश पांचाळ याचा शोध घेवून त्यास अटक करण्यात आली . ऋषीकेश पांचाळ हा सराईत असून त्याचे विरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे मागील दोन वर्षात हत्यार कायदा , खुनाचा प्रयत्न , दुखापत , जबरी चोरी असे ०५ गुन्हे दाखल आहेत,या गुन्ह्यातील त्याचा साथीदार आकाश दिपक साटम वय २१ वर्षे रा . लेन . ४ काळेपडळ , हडपसर , पुणे यास अटक करून गुन्हयातील शाईन दुचाकी व फिर्यादीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे . या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत .
आणखी एका घटनेत एका हाॅटेल व्यावसायिकास गळ्यावर कोयता लावून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हाॅटेलच्या गल्ल्यातील २४,००० रुपये बळजबरीने चोरुन नेले.याबाबतची तक्रार अमिर इब्राहीम तांबोळी , वय २४ वर्ष , रा . ए.के. बिल्डींग , अल्फा पेट्रोल पंपासमोर , कुंजीरवाडी यांनी दिली.याचा तपास हडपसर पोलीस करत असताना सीसीटीव्ही मधुन मिळालेल्या त्रोटक माहिती आधारे अनोळखी आरोपींना शोधून काढत हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाने कौशल्याने गुन्ह्यातील एकुण ७ आरोपी निष्पन्न केले या दरोडयाच्या गुन्हयात ०३ आरोपी १ ) शुभम रमेश मोरे वय २२ वर्ष रा . शिवनेरी कॉलनी नंबर ०२ , पापडे वस्ती भेकराई नगर हडपसर पुणे २ ) प्रसाद हनुमंत कांबळे वय २१ वर्ष रा . घरोंदा सोसायटी , घर नंबर ३७५ , फुलेनगर विश्रांतवाडी पुणे ३ ) हेमंत संदीप चौगुले वय २० वर्ष रा . चौगुले मळा , मातृछाया बिल्डींग , शिवरकर उद्यानजवळ वानवडी पुणे यांना अटक करुन त्यांना दि .०३ / १० / २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आलेली आहे, त्यांचे फरारी साथीदार कौतुक क्षिरसागर , अंबर शेख , रोहन धोत्रे , धनेश शिंदे यांचेसह गुन्हा केला असल्याचे तपासामध्ये कबुल केले आहे, हे सर्व महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी असून त्यांनी मौजमजेसाठी पैशाची आवश्यकता असल्याने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे . अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे , हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत .
गुन्हयांचा तपास उघडकीस आणण्यात अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -५ , पुणे शहर नम्रता पाटील आणि सहा पोलीस आयुक्त , हडपसर विभाग बजरंग देसाई यांनी मार्गदर्शन केले . वरीष्ठांचे मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे , इस निरीक्षक ( गुन्हे ) , विश्वास डगळे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , तपास पथकाचे सपोनि श्री विजयकुमार शिंदे , पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांनी कामगिरी केली आहे .
