पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  कोरोना लसीकरणाचा वेग सर्वत्र वाढलेला असल्याने प्रत्येक गावचे प्रतिनिधी आपापल्या परीने लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे असेच कदमवाकवस्ती येथे गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोठया प्रमाणावर चालू आहे परंतु आज यास पदाधिकाऱ्याच्या वादामुळे वेगळेच वळण लागले.कदमवाकवस्ती येथील एंजल हायस्कूल लसीकरण केंद्रावर लसीकरणादारम्यान सुजित सुभाष काळभोर व अविनाश उर्फ पप्पू बदडे यांच्यात वाद झाला यावेळी सुजितने अविनाश यांच्या कानशिलात लगावली हा वाद वाढू  म्हणून सरपंच गौरी गायकवाड भांडण सोडवण्यासाठी गेल्या त्यावेळी सुजितने त्यांच्यावरही हात उचलला व डाव्या हाताला धरून जमिनीवर पाडले आणि लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरली.

       यावर सरपंच गौरी गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी आपले सहकारी पोलीस निरीक्षक सुभाष काळे,पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे,सदाशिव गायकवाड या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व परिस्थिती नियंत्रणात आणली.
        या घटनेमुळे गौरी गायकवाड यांच्या रक्तदाब वाढल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
       हा वाद नेमका कोणत्या कारणासाठी घडला हे गुलदस्त्यात असले तरीही एकावर्षावर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *