पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गणपती उत्सव काळात नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे पालन करावे अन्यथा कोरोनाची रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नका असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात एका पत्रकार परिषदेत दिला.

       कोरोनाचे रुग्ण संख्या नियंत्रणात आल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले परंतु नागरिक यानंतर स्वैर वागू लागले आजची पुण्यातील गर्दी पाहता कोरोना सारखा आजार आहे की नाही याबद्दल शंका येते बाजारपेठेत प्रचंड गर्दी पहावयास मिळते आहे. अनेकजण मास्क वापरत  नाहीत.कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांनी गांभीर्याने वागणे आवश्यक आहे.
       पुढच्या आठवड्यात गणपतीचे आगमन होणार आहे तसेच गौरीच्या सणाची लगबग सुरू होणार आहे त्यामुळे गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा प्रतिबंध आणखी कडक करावे लागतील याचे भान राखावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *