पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) झुंज या संस्थेच्या माध्यमातून दर महिन्याला एक गिर्यारोहण मोहिम राबविण्यात येते यामागचा हेतू हा की या ऐतिहासिक गड किल्ल्यांचे महत्त्व समजावून घेणे दुर्लक्षित ठिकाणाचा शोध घेऊन त्याची डागडुजी करणे प्रगल्भ इतिहासाची मुलांना जाणीव करून देणे हा होय.
या महिन्यातील गडसहल, भोर या मराठा इतिहासातील एका अत्यंत महत्वाच्या गावात आयोजित केली होती. या सहलीच्या माध्यमातून, आयोजकांनी किल्ले विचित्रगड, कोयाजी बांदल समाधी व परिसरातील ऐतिहासिक वास्तुंचे महात्म्य जनसामान्यांना कळावे यासाठी या मोहिमेचे आयोजन केले होते.

या सहलीत पुण्यातून 50 गडप्रेमींनी सहभाग नोंदवला. मोहिमेच्या अंतर्गत, भोर गावात जाऊन, झुंज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लोकांसाठी नाश्ता तयार केला व त्या नंतर गिर्यारोहणास सुरूवात झाली,सुरूवातीस सर्वांना किल्ले विचित्रगड वर जाण्याबद्दल आवश्यक सूचना दिल्या. 9 लोकांचे 5 गट तयार करण्यात आले,
प्रत्येक गटाला एका नदीचे नाव देण्यात आले.

गडावर पोहोचल्यावर, महत्त्वाच्या ठिकाणची माहिती झुंज संस्थेचे सहसंस्थापक व गिर्यारोहण प्रमुख सुश्रुत किंगे व ऋतुराज काळे यांनी दिली. झुंज चे अध्यक्ष मल्हार पांडे व उपाध्यक्ष सौरभ जगताप यांनी संस्थेचे ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचे कार्य, त्याचे महत्व, गड किल्ल्यांची निगा राखण्याची गरज व इतर गोष्टींवर भर देत विविध मुद्दे आलेल्या लोकांसमोर मांडले. संपर्क प्रमुख, ऐश्वर्य केंदळे, पूजा बडेकर, व्यवस्थापन प्रमुख विक्रम टिळेकर व वैष्णवी कुंभार या सर्वांनी आलेल्या लोकांसोबत योग्य समन्वय साधून ही मोहिम सुखरूपपणे पार पाडली.

गड उतरून खाली आल्यावर ‘झुंज’ ने पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणाचे आयोजन केले होते. मोहिमेततील अंतिम टप्पा म्हणजे कोयाजी बांदल यांचे समाधीस्थळ, इकडे सगळे मंडळी जमल्यानंतर व समाधीची दुरवस्था दाखवत अध्यक्ष मल्हार पांडे यांनी या समाधीची डागडुजी करून पुन्हा एकदा लोकांसाठी अर्पण करायची आहे अशी मदतरुपी घोषणा केली.
याच प्रसंगी, मोहिमेत सहभाग घेेतलेल्या सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. बाल गिर्यारोहक यशदिप वेदपाठक, ऋतुजा वेदपठाक, जिजा वाईकर व शौर्य कदम या सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आली.
