पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) भिगवण पोलिसांचे पथक आपल्या हद्दीमध्ये राञगस्त करत असताना राञीच्या अंधाराचा फायदा घेऊन दोन इसम आपले अस्तित्व लपवून फिरताना आढळले त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता ते दोघे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीसह मोबाईल व इतर गोष्टी चोरीच्याच असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भिगवण गावच्या हद्दीत दोन व्यक्ती ज्यूपिटर मोटरसायकल वरुन संशयित रित्या फिरताना दिसले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यापैकी१)चैतन्य पाडुंरंग शेळके,२)किशोर सहदेव पवार दोघेही राहणार भोञ ता.परांडा जि उस्मानाबाद यांच्याकडे चौकशी करत असता सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावर त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांच्याकडे असलेली ज्यूपिटर वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीतून चोरल्याचे तसेच शिरुर पोलिस स्टेशन हद्दीतून ट्रक्टर चालकाला अडवून मारहाण करुन त्याच्याकडून रोख रक्कम व ट्रक्टर बळजबरीने चोरी केल्याची कबूली दिली तसेच त्यांच्याकडे असणारा मोबाईल पंरांडा येथून चोरी केल्याचे कबूल केले.त्याच्यावर भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई बारामती उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे,पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम,विनायक दडस पाटील,पोलिस अंमलदार समिर करे,सचिन पवार,महेश उगले,अंकुश माने, अजित सरडे,होमगाई आप्पा सातपुते,लक्ष्मण ढवळे,पोलिसमिञ रवि काळे,सिध्दू आळंदकर,अशोक सुळके यांनी केली.
