थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) लोणी-काळभोर येथील अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेची 34 वी सर्वसाधारण सभा स्व.सोपानराव हाडके सभागृहात पार पडली.पतसंस्थेस एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून यावर्षीही सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप करण्यात येईल असे संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कुंभार यांनी जाहीर केले.गेली सलग पंधरा वर्षांपासून संस्था 15 टक्के लाभांश वितरित करत आहे.
यावेळी संस्थेचे संचालक हेमंत हाडके,कृष्णा पवार,सचिन काळभोर, पांडुरंग काळभोर, जयेश हाडके,विठ्ठल लांडगे,शामराव शेवाळे चांगुणाबाई शिर्के,रमेश भोसले अशोक भोसले व सभासद उपस्थित होते.या सर्वसाधारण सभेत सभासदांच्या दहावी बारावीत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या पाल्यांचा गौरव करण्यात आला.तर गेली पंचवीस वर्षापासून पिग्मी एजंट म्हणून काम करणारे दत्तात्रय शिर्के यांचाही सत्कार करण्यात आला.अहवाल वाचन व सूत्र संचालन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा तुपे यांनी केले.तर कर्मचारी धनराज बनसोडे,विजय जाधव, आर्चना विद्वांस व कानिफनाथ गणगे यांचा सत्कार करण्यात आला.
