थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पूर्व हवेलीतील पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या कुंजीरवाडी,सोरतापवाडी,आळंदी (म्हातोबा) थेऊर अशी अनेक गावे नर्सरी हब म्हणून ओळखली जातात यामध्ये लहान मोठ्या अशा शेकडो रोपवाटिका(nursery) असून यामध्ये अनेक देशी विदेशी रोपांसह विविध प्रकारच्या फुलांची झाडे तयार होतात.पंरतू मागील आठवड्यात झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांसह नर्सरी उद्योगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या उद्योगला या पावसाचा मोठा फटका बसला त्यामुळे नर्सरी चालक हतबल झाले असून खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत अशात पावसामुळे रोपांचे नुकसान यामुळे शासनाने नर्सरीला नुकसान भरपाईचे पंचनामे करुन मदत करावी अशी मागणी नर्सरी चालक करत आहेत यात कच्चा मालासह कुंडीत तयार झालेली रोपे,त्यासाठी लागणारी लालमाती खाते,कोकोपिट यांचे अतोनात नुकसान झाले मुसळधार पावसामुळे रोपे पावसाच्या पाण्यात तरंगत होती तर रोपे कुंड्या तसेच कच्चा मालचे पावसापासून वाचवण्यासाठी अक्षरशः नर्सरी उद्योजकांची दमछाक झाली होती आधीच दोन वर्षा पासून करोनामुळे ठप्प असलेला नर्सरी व्यवसाय आता कसातरी रुळावर येत असताना अचानक झालेल्या पावसामुळे नर्सरी चालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
“पावसाच्या पाण्यामुळे आमच्या नर्सरीत पाणी येऊन रोपे पूर्ण पाण्यात राहिल्याने रोपे पिवळी पडली असून यामुळे रोपांवर रोग पडत आहे त्यामुळे या रोपांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने मदत करावी“
रामदास कुंजीर (नर्सरी चालक कुंजीरवाडी)

“ढगफूटी सदृश्य पावसामुळे माझ्या नर्सरीत सर्वत्र पावसाचे पाणी शिरुन रोपे पाण्यावर तरंगत होती पाणी बाहेर निघण्यासाठी जवळपास बारा तास गेले यात कच्चा माल तसेच देशी विदेशी रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दत्तात्रयउर्फआबा काळे(नर्सरी उद्योजक थेऊर)

“आमच्याकडे गुलाब तसेच जास्वंद ची रोपे तयार केली जातात मागील आठवड्यात झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसामुळे नर्सरीतील रोपांचे अतोनात नुकसान झाले असून विक्रीला आलेली रोपे पावसाच्या अतिरिक्त पाण्यामुळे खराब झाली“
बापूसाहेब घुले(नर्सरी उद्योजक कुंजीरवाडी)
