थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) गेल्या चोवीस तासात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने धरनात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे मुळा मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे सध्या हा प्रवाह पंचवीस हजार क्युसेक इतका आहे तो तीस हजारांवर जाण्याची शक्यता आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्याच्या अनेक भागात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे.राज्यातील सर्व धरणे तुडूंब भरली आहेत त्यामुळेच नद्या दुथडी भरून वाहत आहेत अनेक धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.पुण्याच्या धरण मालिकेत जोरदार पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला धरणातून आज पंचवीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे त्यामुळे मुळा मुठा नदीला पूर आला आहे.शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी अगोदरच काढून घेतल्या आहेत.
नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहण्याचे तसेच नदी पात्रात न जाण्याचे आवाहन विजय पाटील यांनी केले आहे.
