पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) तथाकित अर्थपूर्ण कार्ड सिस्टीम मुळे अवजड वाहतुक करणाऱ्या डंपर हायवाच्या फेऱ्यामुळे थेऊरकरांसह रस्त्याचे काम करणारे ठेकेदार हैराण १आॕगस्टपासून थेऊर गावठाणा अंतर्गत येणारा मुख्य रस्त्याचे क्राॕंक्रिटीकरणाचे काम युध्द पातळीवर चालू आहे यासाठी जड वाहतूक या महामार्गावरील बंद करण्याचा निर्णय वाहतुक शाखेचे पोलिस उपआयुक्त राहूल श्रीरामे यांनी तसे आदेश लोणीकंद वाहतुक शाखा वलोणीकाळभोर वाहतुक शाखेला दिले होते व हलकी वाहतुक थेऊरच्या बाह्यरस्त्याने सुरु केली होती परंतु एक महिना झाले या महामार्गावरुन दररोज जवळपास शंभर डंंपर थेऊरच्या अरुंद रस्त्याने क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन जातात त्यामुळे थेऊरमधील रस्त्याची पुरती वाट लागली असून अनेकचे घरासमोरील ओटे,पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन,लाईटचे पोल,गटरलाईनचे चेंबर याचे अतोनत नुकसान झाले आहे या रस्त्यावर मोठ्या वाहनामुळे रस्त्यावर तास् तास वाहतूक कोंडी होते रस्ता अरुंद असल्यामुळे तूतूमैमै होत आहे.
जड वाहतुक बंद असताना व केसनंद तसेच थेऊरफाटा याठिकाणी वाहतुक पोलिस दररोज कर्तव्यवर असताना हे मुजोर डंपर हायवा चालक रुबाबात वाहने घेऊन जातातच कसे हा प्रश्न येथील सर्व सामान्य नागरिकाना पडला आहे अवजड वाहतुकीवर कारवाई करण्यास वाहतुक शाखा नेमकी टाळाटाळ का करत आहे एरवी जर दुचाकीस्वार किंवा कारचालक याने वाहतुकीचा एखाद्या नियम मोडला तर त्याच्यावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते आणि पोलिसासमोर अवजड वाहनाना रस्ता बंद असून देखील वाहतुक खुलेआम सुरु राहते यात काहीतरी अर्थपूर्ण संबध असणार अशी शंका येथील नागरिकांना आहे वाहतुक पोलिसांनी वाहतुक नियमन करण्या ऐवजी या अवजड वाहतुकी कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असून चक्क पोलिस उपआयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे यांची खंमग चर्चा थेऊर परिसरात असून लोक चिंतामणी गणपती बाप्पाला दररोज साकडे घालतात आज तरी अवजड वाहुक बंद होऊन अशी क्षमतेपेक्षा जास्त माल वाहणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई होईल?
