थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) श्री साईबाबा विश्वस्त मंडळाच्या 17 सदस्यीय मंडळाची महाविकास आघाडीने केलेली नियुक्ती औरंगाबाद खंडपिठाच्या उच्च न्यायालयाने रद्द केली असून नवीन विश्वस्त मंडळ 8 आठवड्यात स्थापन करण्याच्या राज्य सरकारला सूचना केल्या आहेत.नविन मंडळ कार्यरत होईपर्यंत संस्थानचा कारभार प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर जिल्हाधिकारी व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती पाहिल तर या समितीला मोठे अर्थिक व धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत असे स्पष्ट केले.

महाविकास आघाडीने विश्वस्त मंडळ नियुक्त केल्यानंतर माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी अर्ज दाखल केला होता.या अर्जावर सुनावणी न्यायमूर्ती आर डी धानुका व न्यायमूर्ती एस जी मेहरे यांच्या खंडपीठासमोर पार पडली.ही सुनावणी 21 एप्रिल 2022 रोजी पूर्ण झाली व निकाल राखून ठेवण्यात आला होता अर्जदाराकडून वकील म्हणून प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *