पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पूर्व हवेलीतील केसनंद गावात बुधवारी पहाटे नागरिकांना बिबटयाचे दर्शन झाल्याने या परिसरात शेतकरी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पृसरले असून बिबटयाने एका वासरु हल्ला केल्याची महिती मिळत आहे गावात दूध उत्पादकांची संख्या मोठी असून जनावरांच्या गोठे मोठ्या प्रमाणावर आहे तसेच केसनंद गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहेत त्यात पहिल्यादांच पूर्ण वाढ झालेला बिबटया परिसरात आल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनखात्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ पिंजरे लावून बिट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केसनंदच्या उपसरपंच अक्षदा सचिनआप्पा हरगुडे यांनी केली आहे. वनविभागाने घटनेची गंभीर दखल घेत रेस्क्यु टीमला पाचारण करुन आपले काम सुरु केले आहे.शेतकऱ्यांनी शेतीमध्ये काम करत असताना राञी अपराञी येताना सावधगिरी बाळगून सतर्क राहावे विशेषतः लहान मुले जेष्ठ नागरिक यांची काळजी घ्यावी असे आवाहन पुणे जिल्हाला पोलिस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष पंडीत हरगुडे व वनरक्षक बळीराम वायकर यांनी केले आहे.
