मुंबई (हवेलीनामा आॕनलाईन) मुंबई महापालिकेत सर्व सामान्य जनतेचा पैसा हवा तसा उधळून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे याची चौकशी करण्यासाठी विशेष महालेखा परिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

दुफळीमुळे अगोदरच कमकुवत झालेल्या शिवसेनेला शिंदे फडणवीस सरकारने निर्णायक आघात करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या प्रश्नाबाबत सत्तारूढ पक्षाने नियम 293 अन्वये चर्चा उपस्थित केली यात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे असून त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची घोषणा केली.यात अधिकाऱ्यांनी रातोरात कंपन्या स्थापन करून कंत्राटे मिळविली.अनेक कामात गैरव्यवहार झाले आहेत याची स्पेशल कॅग नेमून चौकशी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *