पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) कंपनीतील विज कनेक्शन बंद करण्यासाठी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची खातरजमा करून अभियंत्यास ताब्यात घेतले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार,महावितरणच्या भोसरी उपविभागात कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत असलेल्या संतोषकुमार गिते याने कंपनीतील विज कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज दाखल केला होता यावर गिते याने तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयाची मागणी केली त्यावर त्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली याची खातरजमा झाल्यानंतर गिते यास ताब्यात घेण्यात आले आहे.त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *