थेऊर हवेेलीनामा ऑनलाईन) थेऊर येथील गावातील मेन रोडचे गावठातील साधारण सहाशे मीटर रस्त्याचे काम चालू असल्याने लोणीकंद थेऊरफाटा या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी वाहतूक शाखेच्या लोणीकंद तसेच लोणी-काळभोर शाखेला लेखी सूचना देऊन देखील या मार्गावर अनेक अवजड वाहने येत असून यामुळे गावातील अरुंद रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे या जड वाहतुकीस परवानगी कशी मिळते वरिष्ठाच्या सूचनेची अवहेलना होताना दिसत आहे.

थेऊरफाटा लोणीकंद रस्त्याचे अष्टविनायक रस्ते प्रकल्पा अंतर्गत काम चालू असून जवळपास सर्वच टप्प्यातील काम पूर्णत्वास आले आहे केवळ थेऊर गावातील सहाशे मिटर रस्त्यावर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम आणि बकोरीफाटा येथील थोडे काम शिल्लक आहे यापैकी थेऊर गावातील काम चालू असून यासाठी या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली असून प्रत्येक चौक तसेच दोन्ही महामार्गावर तसे सूचना फलक लावले आहेत तरीदेखील अनेक मुरुम, खडी,क्रेशरचे शेकडो ओव्हर लोड असलेले हायवा मोठे मालट्रक विनादिक्कत येत आहे सध्या ही वाहतूक गावातील अरुंद रस्त्याने वळविण्यात आली आहे.त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून गावातील गटारीचे चेंबर लाईटच्या तारा यांचे अतोनात नुकसान होत असून अंतर्गत रस्त्याची वाट लागली असल्यामुळे थेऊरमधील रहिवाशी नागरिक पुरते वैतागले आहेत रस्ता वाहतुकीस बंद असून अवजड डंपर वाघोलीवरुन येतातच कसे यात वाहतुक विभाग कारवाई करण्यास का कुचराई करत आहे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे अशा वाहतुकीचा नियम मोडणाऱ्या डंपर तसेच हायवा मालकांवर कारवाई करणार का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला तसेच वाहतुक विभागाचाच याला छूपा पाठिंबा तर नाही ना अशी नागरिकांना मध्ये चर्चा आहे

यावर रस्त्यावरील काम करणाऱ्या ठेकेदाराकडून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी गार्ड ठेवण्यात आले आहेत परंतु त्यांना हे अवजड वाहतुक करणारे डंपर तसेच हायवा चालक अरेरावाची भाषा करत आहेत परिणामी गावातील वाहतुक फिरवलेला रस्त्याने लहान वाहने मोठी वाहने यांच्यात वाहतुक जाम झाल्यामुळे हमरातुमरी होते आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *