मुंबई (हवेलीनामा ऑनलाईन) आज विधानसभेत सत्ताधारी पक्षातील आमदार नितेश राणे यांनी राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे वाढत असून याला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदू मुलीशी लग्न करून धर्मांतर करण्यास भाग पाहणाऱ्या तरुणास पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट केला.

भारतीय राज्यघटनेत आठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकास आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे परंतु अलिकडे बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे.विशेषतः हिंदू धर्मातील मुलींशी लग्न करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते यासाठी हिंदूमधील जातीनुसार हे रेटकार्ड असल्याचे रोणे यांनी सभागृहात सांगितले हे रेटकार्ड पाच लाख ते दहा लाखाच्या दरम्यान आहे.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत असे मनाविरुद्ध व जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल आणि गरज भासल्यास विशेष कायदा करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *