पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) मुंबईतील रस्त्याची झालेली चाळण पाहता यावर गेल्या पाच वर्षात खर्च झालेल्या बारा हजार कोटी रुपयाचा मलीदा नेमका कोणी हडप केला हा प्रश्न उपस्थित झाला कारण काॅग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी याकाळात रस्त्यावर जो खर्च झाला त्याच्या सी बी आय चौकशीची मागणी केली आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे.काॅग्रेस हा महाविकास आघाडीतील एक घटक आहे आहे शिवसेना हा त्यातील मित्रपक्ष ज्याची या महानगरपालिकेत सत्ता होती.
दरवर्षीच पावसाळ्यात मुंबईतील रस्त्याची दुरावस्था होत असते याच रस्त्याच्या डागडुजी देखभाल दुरुस्ती यावर कोटियावधी रुपये खर्च केले जातात पण याचा दर्जा सुमार असल्याने या अडचणीतून मुंबईकरांची सुटका होतच नाही.मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समोर असल्याने ही विरोधकांना नामी संधी उपलब्ध झाली आहे.
काॅग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी या रस्त्यावरील झालेल्या खर्चाची सी बी आय चौकशीची मागणी केल्यानंतर शासन काय प्रतिसाद देते हे पहावे लागेल.
