थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी स्टेशन चौकात दुचाकी वाहनास अवजड वाहनाने ठोकरल्याने दोन विद्यार्थीनी जागीच ठार झाल्या त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोणी-काळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसात वाजता पांडुरंग नवनाथ भिक्षे वय 42 वर्षे, धंदा वाचमेन, राहणार काळभोर नगर, लेन नंबर दोन ,रूम नंबर 403, कवडी पाठ, तालुका हवेली ,जिल्हा पुणे हे कवडी पाट येथून त्यांच्या भाच्यांना शाळेत सोडण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावरुन जात असताना लोणी स्टेशन चौकात त्याच्या दुचाकी वाहनास एका अवघड वाहनाने पाठीमागून जोरदार ठोसर दिली त्यात मामा आणि मुली वेगवेगळ्या ठिकाणी पडल्या नंतर ते वाहन मुलींच्या अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या असून यात मामाला कुठेही दुखापत झालेली नाही.

या अपघातात गायत्री नंदकुमार शितोळे वय 17 वर्षे व राजश्री नंदकुमार शितोळे वय 10 या मृत्युमुखी पडल्या आहेत.लोणी-काळभोर पोलीस घटनास्थळी पोहोचले व अपघातग्रस्तांना मदत केली.अपघातानंतर तो अवजड वाहनचाकल तेथूनफरारझाला होता परंतु ते वाहन शोधण्यात पोलीसांना यश आले आहे. पुढील तपास लोणी-काळभोर पोलीस करीत आहेत.
