थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) थेऊर नायगाव रस्त्यावरील पडलेले खड्डे भरण्यास विभागाकडे पैसे नाहीत त्यामुळेच गेली अनेक महिन्यांपासून या विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत विशेष म्हणजे या रस्त्याकडे बांधकाम खात्याचे अधिकारी फिरकत नाहीत.
तिर्थक्षेत्र असलेल्या थेऊर पासून पूर्वेकडे नायगाव – प्रयागधाम – खामगाव टेक पर्यंत जाणार्या रस्त्याकडे गेल्या कही वर्षापासून बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही.या रस्त्यावर युती काळात तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता त्यानंतर याचे काम होणे अपेक्षित होते यात केवळ नायगाव पासून रुकेवस्ती दरम्यान रस्त्यावर खडीकरण झाले या रस्त्यावर डांबर गेल्या दोन वर्षांपासून मिळालेच नाही.
थेऊर गावठाणातील रस्त्याच्या वळणावर मोठे खड्डे आहेत.रस्ता अरुंद त्यात रस्त्यावर अवजड वाहने त्यामुळे मोठा अपघात झाला तर कोण जबाबदार हा नागरिक प्रश्न करीत आहेत. यावर बांधकाम खात्याच्या दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्याकडे याचे लक्ष वेधले असता केवळ हसून हा विषय टाळला.नागरिकांना शासन सेवा पोहोचवणार आहे की नाही.

“या रस्त्या अतिशय दुरावस्था झाली आहे याचा स्थानिक नागरिकासह भाविकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची लवकरात लवकर देखभाल होणे आवश्यक आहे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल” असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हवेली तालुकाध्यक्ष मारुती कांबळे यांनी सांगितले.
