थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) “जेष्ठ नागरिकांना हवा विरंगुळा,रस्त्याच्या कडेला बसून गप्पा मारण्याची वेळ”या मथळ्याखाली “हवेलीनामा” या न्युज पोर्टलमध्ये बातमी प्रसिद्ध झाली यावर जेष्ठांना निवांत बसून गप्पा मारण्यासाठी बैठक व्यवस्था होणे अपेक्षित होते परंतु शासकीय पातळीवर याचा विचार होणे शक्य आहे तरीही थेऊर येथील सेवानिवृत्त सैनिक बळीराम वायकर यांनी आपल्या स्वखर्चातून या ठिकाणी सिमेंटचे बाकडे उपलब्ध करून दिले यामुळे या जेष्ठांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे.
जेष्ठ नागरिक हा समाजातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे वयाच्या उतार वयात आपल्या सम वयस्क सहकाऱ्यासह चार गप्पा मारण्यासाठी एखादे ठिकाण असते अशा ठिकाणी आपल्या जीवनातील सुखदुःखाचे क्षण एकमेकांना कथन केले जातात.थेऊर येथील नायगाव रस्त्यावरील चौकात दगडावर बसून कीही जेष्ठ नागरिक गप्पा मारत असल्याचे दिसून आले यावर हवेलीनामाच्या माध्यमातून एक बातमी करण्यात आली यावर ग्रामपंचायत, पंचायत समिती अअथवा जिल्हा परिषद त्यांना हक्काची बैठक उपलब्ध करून देईल असे वाटले परंतु याची उणिव एका सेवानिवृत्त सैनिकाने आपल्या ऐपतीप्रमाणे एक बाकडे उपलब्ध करून पूर्ण केली.
